उर्जा आणि पर्यावरण विभागातील प्रकल्प ( ग्रे वॅाटर)




विज्ञान आश्रम
नाव:- अक्षय काजरेकर
विभाग:- उर्जा आणि पर्यावरण.
प्रकल्प:- ग्रे वॅाटर





अनुक्रमणिका

अ.क्र
तपशील
.
प्रस्तावना
.
उद्देश
.
साहित्य व साधने
.
कृती
.
महत्व
.
फोटो
.
निरीक्षण







प्रस्तावना:- 
     ग्रे वॅाटर म्हणजे समावेश सिंक, सरी,  अंघोळ, कपडे वॉशिंग मशीन
 किंवा डिश ‌‍वॅाशर यातून येणारे पाणी. या अपिण्यायोग्य पाण्याचा
 वापर सुलभ शौचालय फ्लशिंग, लँडस्केप किंवा पीक सिंचन इ. 
  साठी आपण करू शकतो.
 
 

उद्देश:-
    आमच्या वसतिगृहातील निघनाय्रा सांडपाणीचा (ग्रे वॅाटरचापुनर्वापर करणे.




साहित्य साधने:-
        विटांचे तुकडे, खडी, कर्दळ,जलपर्णी,पान-कणीस, काडी गवत,फावड, कुदळ, घमेल .



कृती:-
1.   पहिल्यांदा मुले अंघोळ करतात कपडे धुतात ते पाणी पहिल्या टाकीत जमा होते. ती टाकीत पूर्ण खडी ने भरली आहे. या टाकीत त्या पाण्यातील  मोठा जसे केस, कपड्यातील तंतूया बेड मधूनच पाणी शुद्धीकरण प्रक्रियेला सुरवात होते. याच टाकीत कर्दळ लावली आहेकर्दळ पाण्यातील सेंद्रिय पर्दार्थ त्याच्या वाढी साठी वापते. त्याचवेळी त्या पाण्यात प्राणवायू मिसळते. या मुळे पाणी शुद्ध होते.
2.   पहिली टाकीतले पाणी दुसऱ्या टाकीत येते या टाकीत खाली विटांचे तुकडे टाकले आहेत. त्यात कर्दळ पाण कणसे लावली आहेतयेथे अधिक प्राणवायू पाण्यात मिसळला जातो. व पाणी शुद्ध होते.
3.   दुसरी टाकी भरली की ते पाणी तिसऱ्या टाकीत पाणी येते. या टाकीत सुद्धाकाही कर्दळ लावली आहे काही पाण्यात येणारे गावात लावले आहे.
4.   तिसरी टाकी पाण्याने भरली की पाणी चौथ्या टाकीत येते. चौथ्या टाकीत पाणी साठवून ठेवले जाते. या टाकीत पाण्यावर तरंगणारी हायसिंग नावाची वनस्पती सोडली आहे. त्या मुले पाण्यातील नायट्रोजन कमी होते. तसेच पाणी स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच  त्या पाण्यात प्राणवायू मिसळतेपाण्यातील जड धातू जसे  शिसे या वनस्पती मुळे कमी होतातही वनस्पती पाण्यात तरंगत असल्यामुळे टाकीची साठवण क्षमता वापरता येते.
ह्या पाण्याचा  वापर करण्यासाठी दोन toilet आहेत. यात हे पाणी मैला वाहून नेण्यासाठी वापरता येते.
मी या चौध्या टाकीजवळ चार बेड तयार केले आहेत. त्यात मी काडी गवत लावले आहे. त्या बेड मध्ये पाला पाचोळा टाकून मल्चिंग केले. जेणे करून ते पाणी उन्हाने उडूनजायला नको.
त्या चारही बेड मध्ये शेणाचे स्लरी टाकली आहे जेणेकरून त्या कादिगाव्ताची वाढ उत्तम प्रकारे होईल.



महत्व :-
    रोज साधारण ४० मुले एकाच ठिकाणी अंघोळ करतात ते स्वताचे कपडे दुतात. या प्रमाणे रोज प्रत्येकी ३५ लिटर पाणी लागत असेल तरी १४०० लिटर पाणी रोज वापरले जाते. आपण toilet आणि झाडांना पिण्यायोग्य पाणी देत असू तर ते पाणी अधिक पाणी वापरले जाते. म्हणूनच रोज साधारण १४०० लिटर पाणी हे वाया घालवण्य अएवजी हेच पाण्याचा आपण पुनर वापर केला तर पिण्यायोग्य पाणी चांगल्या करणा करता वापरला जाऊ शकते.



फोटो:-













निरीक्षण:-
1. अंघोळीच पाणी, साबणाचा पाणी हे चौध्या टाकीत येई पर्यंत  शुद्ध होते.
2. चौध्या टाकीतल्या पाण्यात DO % होते.
3. दुसर्या तिसऱ्या टाकीतल्या करडी पाण्यातील गवताची वाढ चांगली झाली.
4. चौध्या टाकीत पाणी जास्त दिवस तसेच ठेवल्याने पाण्याला वास येतो.


Comments

Popular posts from this blog

पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली, नरसाळे, सुपली, बनवणे.